
लोकसभा निवडणुक दरम्यान दिलेले आश्वासन आ. शेखर निकम यांनी चोख बजावले
आमदार साहेब, तुमच्या सारखे खंबीर पाठबळ आम्हाला यापूर्वी मिळाले नाही, तुमची खंबीरसाथ आणि तुमच्याकडून शासनदरबारी होणारा पाठपुरावा यामुळेच आमचे प्रश्न मार्गी लागत आहेत. तुमच्यामुळेच विना दंड रिक्षा पासिंग होणार असल्याची भावना व्यक्त करीत रिक्षा संघटनेच्या पदाधिकार्यांनी आ. शेखर निकम यांचे आभार व्यक्त केले.रिक्षा चालक-मालक व्यावसायिकांच्या अनेक मागण्या अनेक वर्ष खितपत पडल्या आहेत. या संदर्भात लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आ. शेखर निकम यांनी मध्यस्थी करून हा बहिष्कार मागे घेण्यास लावला होता.www.konkantoday.com