
रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार
_गेले दोन-तीन दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा सह संपूर्ण कोकणपट्टीला मुसळधार पावसाने झोडपून काढल आहे. या आठवड्यामध्ये सुध्दा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला होता.रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा हा जोर असाच कायम राहणार आहे. 22 जुलै पर्यंत रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला असून या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर मात्र 23 आणि 24 जुलै रोजी येलो अलर्ट देण्यात आला आहे खेड मधील जगबुडी नदी ची पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या वर आहे मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या पडझडीच्या घटना घडत आहेत