
भर समुद्रात मालवाहू जहाजाला आग! नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू!!
गोव्याच्या दक्षिण-पश्चिमेस सुमारे 102 नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या कंटेनर मालवाहू जहाजाला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. दिवसांपासून सतत सुरू आहेत आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.हे जहाज गुजरातमधील मुंद्रा बंदरातून श्रीलंकेतील कोलंबोला जात होते. या घटनेची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाने तात्काळ धाव घेतली आणि बचाव जहाजांना (ICG) मदतीसाठी पोहोचण्यास सांगितले.याशिवाय, परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ICG डॉर्नियर विमान देखील उतरवण्यात आले आहे. आयसीजी जहाजाने आगीत अडकलेल्या क्रूला त्यांच्या सुरक्षिततेची खात्री दिली.याव्यतिरिक्त, गोव्यातून दोन ICG जहाजे देखील अग्निशमन प्रयत्नांना वाढवण्यासाठी पाठवण्यात आली होती.सध्या जहाज मंगलोर किनाऱ्याच्या नैरृत्येस ३५ सागरी मेल अंतरावर आहे. गेल्या दोन दिवसांपासून सतत आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.तटरक्षक दलाची ICG सुजित, ICG सचेत आणि ICG सम्राट आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर फाईटिंग करत आहेत.