
जगबुडी नदीवरील पुलाला तडा गेल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग सुरू, पहा व्हिडिओ
एकीकडे कोकणाला मुसळधार पावसाने झोडपले असतानाच आता मुंबई गोवा महामार्गावर निरनिराळ्या समस्या येण्यास सुरुवात झाली आहे लांजा अंजनारी येथे पुलावर पाणी आल्याने वाहतूक थांबवण्यात आली होती आता खेड जगबुडी नदीवरील पुलाला तडा गेल्याचे वृत्त हाती आले आहे मुंबई जगबुडी नदीला पूर आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे. जगबुडी नदीवरील पुलाला तडे गेल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून महामार्गाची पाहणी केल्यानंतर महामार्ग चालू करायचा की नाही याचा पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. आधीच मुंबई गोवा चौपदरीच्या कामा रेंगाळल्या असतानाच त्याच्या दर्जाबाबतही वारंवार प्रश्न उपस्थित होत आहे