चिपळूणात अग्निशमन बंब पोहोचण्यापूर्वीच आगीच्या ठिकाणी आता बुलेट फायर फायटर दुचाकी जाणार
कोठेही आग लागल्यानंतर अग्निशमन बंब पोहोचण्यापूर्वीच आता बुलेट फायर फायटर दुचाकी तेथे जाणार आहेत. त्यामुळे गल्लीबोळातील लहान आगी विझविण्यासह मोठ्या आगींना रोखून ठेवणेही सहज शक्य होणार आहे. अशाा दोन बुलेट दुचाकी चिपळूण येथील नगर परिषदेला प्राप्त झाल्या आहेत.शहर परिसरात अनेक कारणांमुळे लहान मोठ्या स्वरूपाच्या आगी लागण्याचे प्रकार सातत्याने घडतात. काही आगी शॉर्टसर्किट, तर काही वणवे व अन्य कारणांनी लागतात. त्या विझविण्यासाठी चिपळूण नगर परिषदेकडे मोठा अग्निशमन बंब आहे. त्यामुळे लवकरच नवा व आकाराने लहान असणारा बंब मिळावा म्हणून नगर परिषद शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहे. सध्याचा विचार करता एखाद्या ठिकाणी आग लागल्यानंतर त्याची माहिती चिपळूण नगर परिषदेला मिळताच तेथे तातडीने बंब पाठवला जातो. मात्र शहरातील अरूंद रस्ते, कायम असणारी वाहतूक कोंडी यामुळे बंब वेळेत पोहचण्यास अनेकदा विलंब होतो.या दरम्यान लहान असलेल्या आगी नागरिक अनेक उपाय करुन विझवतात. तर काहीवेळा त्यांना रोखून ठेवतात. त्यानंतर बंब पोहचल्यावर आग पूर्णपणे विझवली जाते. www.konkantoday.com