खेड परिसरात मुसळधार पाऊस, खेड दापोली वाहतूक बंद
खेड परिसरात देखील मुसळधार पाऊस पडत असून जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे खेड शहरात काही भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे दापोली खेड राज्य मार्गावर पाणी वाढल्याने खेड दापोली वाहतूक बंद करण्यात आली आहे