
काजळी नदीला प्रचंड पूर मुंबई गोवा महामार्ग ३.३० नंतर बंद.
दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे लांजा तालुक्यातील काजळी नदीला प्रचंड पूर आला असून पुराचे पाणी हे आंजणारी येथील पुलाला चाटून जात असल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक दुपारी ३.३० नंतर बंद करण्यात आली आहे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे दुतर्फा वाहनांच्या लांब लांब रांगा लागल्या आहेत .रविवारी पहाटे पासूनच पावसाने तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी करण्यास सुरुवात केली आहे. दुपारनंतर पावसाचा जोर आणखीन वाढला. सकाळपासून काजळी नदीला प्रचंड पूर आला होता त्यात रविवारी पावसाचे प्रमाण वाढले व पूराचे पाणी आंजणारी पुलाला चाटून जात होते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक थांबवण्यात आली आहे. या ठिकाणी बॅरिगेट्स लावून पोलिसांनी महामार्ग बंद केला आहे.महामार्ग बंद करण्यात आल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.