
७ गणपती स्पेशल फेऱ्या जाहीर करत रेल्वे प्रशासनाचा चाकरमान्यांना सुखद धक्का
गणेशोत्सवातील कोकण मार्गावर धावणार्या नियमित गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने प्रतीक्षा यादीवरील चाकरमान्यांना अखेर रेल्वे प्रशासनाने ७ गणपती स्पेशलच्या फेर्या जाहीर करत सुखद धक्काच दिला आहे. सीएसएमटी-सावंतवाडी, सीएसएमटी-रत्नागिरीसह एलटीटी-कुडाळच्या ३ गाड्यांसह दिवा-चिपळूण मेमू स्पेशलच्या तब्बल २०२ फेर्या धावणार आहेत. या स्पेशल गाड्यांमुळे प्रतीक्षा यादीवरील गणेशभक्तही सुखावले आहेत. चाकरमान्यांच्या नजरा आता आरक्षण खुले होण्याच्या तारखेकडे लागले आहेत.गणेशोत्सवात धावार्या नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने प्रतीक्षा यादीतील चाकरमान्यांना गाव गाठण्याची चिंता सतावत होती. कोकण विकास समितीसह जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेने केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसह रेल्वे राज्यमंत्री व रेल्वे बोर्डाकडे गणपती स्पेशल गाड्या जाहीर करण्यासाठी सातत्याने निवेदने देत पाठपुरावा सुरू ठेवला होता. चाकरमान्यांच्याही नजरा गणपती स्पेशल गाड्यांकडे रोखलेल्या असतानाच मध्य रेल्वे प्रशासनाने अखेर ७ गणपती स्पेशल गाड्या जाहीर केल्याने गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे. www.konkantoday.com