शेअर मार्केटमधून जास्त पैसे मिळवण्याच्या नादात एक महिला फसवणुकीच्या विळख्यात….

शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनोळखी महिलेने थिबापॅलेस येथील महिलेची १ लाख ९० हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी संशयित महिलेविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माया सालम असे संशयित महिलेचे नाव आहे. या प्रकरणी शहरातील थिबापॅलेस येथील महिलेने ही तक्रार नोंदवली आहे. फेब्रुवारी २०२४ ते २ एप्रिल २०२४ या दरम्यान हा प्रकार घडला. तक्रारदार महिलेने वारंवार वरील संशयित महिलेचा फोन येत होता. तिच्याशी गोड बोलून शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष महिलेला दाखवले. महिलेचा विश्‍वास संपादन करून तक्रारदार महिलेला गळी उतरवले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button