विशाळगड गजापूर गावामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची रत्नागिरीतील मुस्लिम समाजाची मागणी

रत्नागिरीतील शहर व तालुका येथील समस्त मुस्लिम समाजातर्फे अतिक्रमणाच्या नावाखाली विशाळगडपासून ४ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गजापूर गावामध्ये मुस्लिम समाजाची घरे व मशिदीत घुसून नुकसान करून दहशत निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांना काल (१९ जुलै) देण्यात आले.जिल्हाधिकारी यांच्या नावाने सादर केलेल्या या निवेदनात या प्रकरणातील सर्व मुद्दे मांडण्यात आले. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात काही समाजकंटक या प्रकरणाचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करून तसेच सोशल मीडियावर व स्टेटस वर ठेवून समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर जिल्हाधिकारी यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला फौजदारकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावे आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी, ही मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी बशीर मूर्तुझा यांनी विशाळगडवर अतिक्रमणाच्या नावाने दूर ४ किमी अंतरावर असणाऱ्या गजापूर गावात झालेल्या घटनेची माहिती देऊन दोषी असणाऱ्या सर्व घटकांवर कडक कारवाईची मागणी केली तसेच सर्व समाजांना शांततेचे आवाहन केले.युवा नेते नौसीन काझी यांनी माध्यमांशी संवाद साधताना देशांमध्ये लोकशाही आहे काय राजेशाही आहे, अशी शंका उपस्थित केली आणि तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवला.यावेळी प्रामुख्याने युवा नेते फरान मुल्ला , ऍड. अल्तमश झारी, जकी खान, बुरान काजी, नदीम सोलकर, मुजफ्फर काझी, नदीम मुजावर, इरफान होडेकर, इमरान फनसोपकर, अतिक साखरकर, समीर मुजावर, अश्फाक कादरी, असिफ अकबानी, श्री. अबरार, फैज काझी, अमान बोट, तनवीर इनामदार, शैबाज होडेकर, मुईज दरवेश, नौमन खोपेकर, नईम पावसकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button