
रत्नागिरी शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला येणार नवी झळाळी
रत्नागिरी शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नवी झळाळी येणार आहे. नगर परिषदेने २६ नोव्हेंबरला होणार्या संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर पुतळ्याला पॉलिश करण्याचे काम सुरू केले आहे. तर लवकरच परिसरातील सुशोभिकरणाच्या कामालाही सुरूवात होणार आहे.२००७ साली बौद्ध समाजाच्या मागणीनुसार व सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर जाधव यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी दिलेल्या मोठ्या लढ्यानंतर नगर परिषदेने येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारला आहे.
शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेला हा पुतळा शहराच्या वैभवात भर टाकत असला तरी मागील काही वर्षाचा विचार करता नगर परिषदेकडून पुतळ्याच्या देखभालीकडे तितकेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप बौद्ध समाजाच्या संघटना व कार्यकर्ते करीत आहेत. सध्या पुतळ्याचा रंग फिका पडण्यासह अन्य बाबी मोडकळीस आल्या आहेत. मध्यंतरी संघटनानी दिलेल्या निवेदनानंतर काहीशी दुरूस्ती करण्यात आली होती. मात्र आता संविधान दिन जवळ आल्याने पुतळ्याच्या पॉलिशचे काम हाती घेण्यात आले असून ते चार दिवसात पूर्ण होणार आहे. www.konkantoday.com