
राजापुरात बंद घरातील सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला..
राजापूर तालुक्यातील पडवे स्टॉप येथील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सुमारे 1 लाख 91 हजार 876 रूपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. ही घटना बुधवार 17 जुलै रोजी सायंकाळी 4.30 ते रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्यादी संतोष सहदेव ठुकरूल (रा. पडवे, राजापूर) यांनी नाटे सागरी पोलीस स्थानकात फिर्याद नोंदविली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहदेव ठूकरुल व त्यांची पत्नी घराला लॉक लावून बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास वडीलांचे वर्षश्राद्ध कार्यक्रम असल्याने पडवे ठुकरूलवाडी येथील जुन्या घरी गेले होते. रात्री 11.30 वाजण्याच्या दरम्याने पडवे स्टॉप येथील घरी आले असता घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. अज्ञाताने घरातील बाथरुमच्या काचा काढून घरात प्रवेश करुन घरातील टिव्ही शोकेशच्या कपाटातील पिशवीत ठेवलेले सुमारे 1 लाख 91 हजार 876 किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचे संतोष ठुकरूल यांनी नाटे पोलीसांत दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे.