रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम राहणार, दोन नद्या इशारा पातळीच्या वर

दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. ठरावीक अंतरानंतर पुन्हा पावसाने उसंत घेतल्याने पुराचा धोका मात्र सध्या तरी जाणवत नाही. दरम्यान, बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे.रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण किनारपट्टी भागात जोरदार ते अतिजोरदार पावसास पोषक वातावरण तयार झाले आहे. पूर्व-पश्चिम वाहणार्‍या वार्‍याचाही प्रभाव पावसावर होणार असल्याने पुढील 48 तासात किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सातारा, चंद्रपूर, भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी व कोदिवली दोन नद्यांची पातळी इशारा पातळीच्या वर आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button