
रघुवीर घाटात जीपने दुचाकीला दिलेल्या धडकेत, तीनजण जखमी
खेड तालुक्यातील खोपी-रघुवीर घाटात जीप चालकाने दुचाकीस धडक देत झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले. या प्रकरणी बुधवारी सायंकाळी उशिरा जीपचालक साहिल सचिन कदम (३२) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अश्रय किशोर कानडे यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. किशोर कानडे हे दुचाकीवरून (एम.एच. ०८/बी.डी. ३१२९) रघुवीर घाट चढत असताना समोरून येणार्या जीपने धडक दिली. यात मानस किशोर कानडे गंभीर जखमी झाले. तर मनिषा कानडे व मांश कानडे किरकोळ जखमी झाले. तिघांच्या दुखापतीसह दुचाकीच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जीप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस करीत आहेत. www.konkantoday.com