मुसळधार पावसामुळे गुहागर येथील ओळवणवाडी-आडीवाडी मार्गावरील मोरी खचली

गुहागर तालुक्यातील मुसळधार पावसाचा फटका मुंढर मुख्य रस्ता ते मुंढर खुर्द ओळवनवाडी आडीवाडी या मार्गावरील रस्त्याची मोरी खचल्याने गुरूवारी सायंकाळी ३.४५ वाजता सुटणारी मुंढर एसटी फेरी रद्द करण्यात आली आहे. या खचलेल्या मोरीबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना तहसीलदार परीक्षित पाटील यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत.गुहागर-मुंढर ही सकाळी सुटणारी एसटी फेरी मुंढर ओळवनवाडी मार्गाने जात असताना एसटी चालकाला तेथील मोरीच्या दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडलेले दिसले. यामुळे या मोरीवरून एसटी गेल्यास मोरी तुटून अपघात होण्याची शक्यता असल्याचे चालकांनी गुहागर एसटी आगारप्रमुख सोनाली कांबळे यांना सांगितले. यामुळे सायंकाळी पावणेचार वाजता सुटणारी गुहागर-मुंढर एसटी फेरी रद्द करण्यात आल्याचे आगारप्रमुख कांबळे यांनी सांगितले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button