
बीएसएनएलचे अच्छे दिन सुरू! राज्यात १५ दिवसात सव्वा लाख नवीन ग्राहक!!
जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या खासगी कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या दरात मोठी वाढ केल्याने त्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर झाला आहे. मात्र, या दरवाढीचा फायदा सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या ‘बीएसएनएल’ला मोठ्या प्रमाणात झाला असून, गेल्या १५ दिवसांत राज्यात एक लाख १९ हजार ६६०, तर नाशिक जिल्ह्यात नऊ हजार २२५ ग्राहकांनी खासगी कंपनीच्या सेवेतून ‘बीएसएनएल’मध्ये आपले सीम पोर्ट केले आहे. वाढत्या ग्राहकांच्या प्रतिसादाने बीएसएनएलला पुन्हा ‘अच्छे दिन’ येण्यास सुरुवात झाली आहे.*२८ जून रोजी जिओ, एअरटेल आणि व्हीआय यांनी दणक्यात आपले रिचार्ज प्लॅन महाग केल्याने त्याचा थेट फायदा बीएसएनएलला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खासगी कंपन्यांची दर्जेदार सेवा, कमी रिचार्ज दर, ५ -जी सेवा या बळावर त्यांनी बीएसएनएलसह इतर खासगी कंपन्यांचे ग्राहक फोडले होते. मात्र पंधरा दिवसांपूर्वी ‘मक्तेदारी’ झालेल्या या कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनचे दर २५ ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढविल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले होते. त्यामुळे ग्राहकांनी पुन्हा आपला मोर्चा ‘बीएसएनएल’कडे वळवला आहे.महाराष्ट्रात दररोज साधारण सात ते नऊ हजार खासगी कंपन्यांचे ग्राहक बीएसएनएलमध्ये आपले कार्ड पोर्ट करत आहे. जुलै महिन्यातील पहिल्या १५ दिवसांतच राज्यात एक लाख १९ हजार ६६० खासगी कंपन्यांच्या ग्राहकांनी बीएसएनएलमध्ये सीम पोर्ट केले आहे. एकूणच जिओ, एअरटेल आणि वोडाफोन या खासगी कंपन्यांच्या दरवाढीच्या निर्णयामुळे सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलला मोठा फायदा होताना दिसत आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियातसुद्धा बीएसएनएल ट्रेंड होताना दिसून येत आहे.*-ए. पी. गायकवाड, उप महाप्रबंधक, नाशिकगेल्या १५ दिवसांत बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. दर्जेदार सेवा तसेच फोर-जी कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ग्राहकांनी बीएसएनएलच्या सेवेचा लाभ घ्यावा.*