
लाईफलाईन फाउंडेशन, रत्नागिरी तर्फे चिपळूण पूरग्रस्तांसाठी मदत रवाना
लाईफलाईन फाऊंडेशन,रत्नागिरी तर्फे चिपळूण पूरग्रस्तांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सुमारे 100 हून अधिक लोकांसाठी मदत साहित्य व वैद्यकीय मदत देण्यात आली. यावेळी लाईफलाईन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य / आत्मनिर्भर कोकण विभाग सह-संयोजक डॉ.ऋषिकेश केळकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष व फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष अॅड. अनिष पटवर्धन, लाईफलाईन फाऊंडेशनचे सचिव ओमकार अभ्यंकर, सोशल मीडिया चे प्रभंजन केळकर आदी उपस्थित होते. सदर मदत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या श्री महेश नवेले सर, अॅड. रेमणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
www.konkantoday.com