गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची निर्णायक भूमिकेने रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदार संघात फुलले ४० वर्षांनी कमळ
कोकणातील तीनही लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड-मावळ या तीनही मतदारसंघाची जबाबदारी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर पक्षाने दिली होती. त्यांनी घेतलेलया निर्णायक भूमिकेमुळे भाजपला संधी मिळाली. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये तब्बल ४० वर्षानी कमळ फुलले आहे. याबद्दल भाजपचे प्रदेश उपाध्य तथा लोकसभा प्रभारी अतुल काळसेकर, सहप्रभारी तथा माजी आमदार बाळ माने यांनी प्रमोद सावंत यांची पणजीत भेट घेवून आभार मानले. खासदार नारायण राणे यांच्या सत्कारासाठी रत्नागिरीत येण्याचे निमंत्रणही दिले.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजपने सन १९८० नंतर प्रथमच कमळाच्या निशाणीवर निवडणूक लढवली. भाजपला ही जागा मिळण्याकरिता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रत्नागिरीचा दौरा केला होता. त्यावेळीच कार्यकर्त्यांना ग्वाही दिली होती की, ही जागा आपल्यालाच मिळणार, आपण जिंकणार. त्याप्रमाणेच झाले. रायगड, मावळ येथेही महायुतीचे उमेदवार विजयी झाले. १०० टक्के यश मिळाल्याबद्दल प्रमोद सावंत यांचे विशेष अभिनंदन बाळ माने यांनी केले. याप्रसंगी श्री काळसेकर, श्री. माने यांच्यासमवेत सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मिहिर माने, बंड्या सावंत या वेळी उपस्थित होतेwww.konkantoday.com