सर्व्हर डाऊनमुळे तालुक्यातील सहा हजाराहून अधिक दाखले मंजुरीविना रखडले
सर्व्हर डाऊनमुळे तालुक्यातील सहा हजाराहून अधिक दाखले मंजुरीविना रखडले आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी हे दाखले अत्यावश्यक असून, यामुळे अनेकजण चिपळूण तहसिल व सेतू कार्यालयात फेर्या मारत आहेत. दरवर्षी शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी जून, जुलै महिन्यांमध्ये दाखल्यासाठी मोठी गर्दी होत असते. परंतु दरवर्षी याच महिन्यांमध्ये सर्व्हर डाऊन होतो. यावर्षी त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासनाने जाहीर केल्याने दाखल्यासाठी अचानक मागणी वाढली याचा परिणाम सर्व्हरवर झाल्याने सर्वच दाखले रखडत आहेत. चिपळूण तालुक्यात तब्बल सहा हजाराहून अधिक दाखल्यांना मंजुरी मिळणे बाकी आहे. यामध्ये सर्वात जास्त संख्या उत्पन्नाच्या दाखल्यांची आहे. www.konkantoday.com