
संकल्प कला मंचचा तिसावा गुरुपौर्णिमा गुणवंत गौरव समारंभ रविवारी
रत्नागिरी येथील संकल्प कला मंच या संस्थेचा तिसावा गुरुपौर्णिमा गुणवंत गौरव समारंभ रविवार दिनांक 21 जुलै 24 रोजी सायंकाळी चार वाजता महिला मंडळ सभागृह मारुती मंदिर रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक आणि मालिका अभिनेते श्री वामन जोग आणि मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या वृत्त निवेदक सौ भक्ति सावंत या उपस्थित राहणार आहेत या मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यात येईल तरी नागरिकांनी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संकल्प कला मंचचे अध्यक्ष श्री विनोद वायंगणकर आणि सल्लागार डॉक्टर दिलीप पाखरे यांनी केले आहे