शेर खामोश है… इसका मतलब ऐसा नही… की जंगल तुम्हारा हो गया…..!, माझ्या शांत स्वभावाचा गैर फायदा घेऊ नका:- उदय सामंत यांचा विरोधकांना इशारा
_शेर खामोश है… इसका मतलब ऐसा नही… की जंगल तुम्हारा हो गया…..! ही शायरी कोणत्या शायर ने नाही तर राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी – रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज आपल्या शेरो शाहिरीने उपस्थितांची मने जिंकत विरोधकांचा चांगलाच धुव्वा उडवला आहे.त्याच्या शायरी तुन विरोधकांना चांगलीच चपराक लगावली आहे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभेचे गेली चार ट्रम २० वर्ष तालुक्याचे आमदार म्हणून नेतृत्व करत आहेत. त्यांचा स्वभाव शांत आणि संयमी असल्याचे अख्या महाराष्ट्राने पाहिला आहे या पूर्ण वीस वर्षांमध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या विकासाला चालना दिली. अनेक विरोधक उदय सामंत यांच्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असतात मात्र उदय सामंत यांनी कधीही कुठल्याही विरोधकांना त्यांच्या टिकेला उत्तर दिले नाही किंवा त्यांना अपशब्द वापरला नाही. मात्र निवडणुका जवळ आल्या ही काही बेडके डराव डराव करायला लागतात त्या पद्धतीची परिस्थिती आता रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळते.आणि म्हणून माझ्या शांत स्वभावाचा गैर फायदा कोणीच घेऊ नये असा इशारच या शायरीतुन मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना दिला आहे. राजकारणात काम करत असताना मी कधीही वैयक्तिक पातळीवर जाऊन कोणावर टीका किंवा वैयक्तिक पद्धतीचे राजकारण माझ्या उभ्या आयुष्यात केले नाही. मात्र हे त्रिकाल सत्य आहे आणि ज्यांना मदत केली ज्यांच्या पाठीमागे उभे राहिलो तेच आज माझ्या नावाने बोंबा मारत सुटले आहेत. स्वार्थी माणसांना मी कधीही उत्तर देणार नाही मात्र त्यांनीही माझ्यावर जरी किती टीका केली तर त्यांना देव कधीही माफ करणार नसल्याचा सल्ला यावेळी विरोधकांना दिला आहे. आज रत्नागिरीकरांची मी सेवा करत आहे. त्यामुळे त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि यापुढे देतील असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी आज व्यक्त केला. ज्यांनी ज्यांनी माझ्यावरती टीका केली त्यांना मी विकासाच्या माध्यमातून उत्तर दिला म्हणून आज रत्नागिरीकर माझ्यासोबत असल्याचा मला अभिमान आहे. मी माझ्या उभ्या आयुष्यात कधी जातीपातीचे राजकारण केलं नाही. मी सामाजिक आणि धर्मनिरपेक्ष काम करत राहिलो आणि यापुढेही करत राहील. रत्नागिरी तालुक्यातील जनता जोपर्यंत माझ्याबरोबर आहे तोपर्यंत मी कोणालाही घाबरत नसल्याचा सल्ला मंत्री उदय सामंत आणि विरोधकांना दिला आहे. त्यांच्या शेरोशायरी मुळे आता येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच रंगत पाहायला मिळणार आहे हे मात्र निश्चित.