विंडोज सुरु होण्यासाठी अजून ५ ते १० तास लागणार? भारत सरकार ॲक्शन मोडमध्ये; मायक्रोसॉफ्टने दिले स्पष्टीकरण!
मायक्रोसॉफ्ट डाऊन झाल्याने जगभरातील अनेक बँक, आयटी, मीडिया, एअरलाईन्सची सेवा विस्कळीत झाली. याचा फटका भारतालादेखील बसला. कम्प्युटर आणि लॅपटॉपवर अचानक ब्लू स्क्रीन दिसू लागल्यामुळं मोठी समस्या निर्माण झाली आहे. विंडोज सुरू होण्यासाठी अजून ५ ते १० तास लागणार अशी नवी अपडेट समोर आली असून भारत सरकारने मोठी निर्णय घेतला आहे.मायक्रोसॉफ्ट सर्व्हर ठप्प झाल्यानंतर केंद्र सरकार मायक्रोसॉफ्टच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. याशिवाय, केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव देखील या प्रकरणाबाबत अधिकाऱ्यांकडून सातत्याने माहिती घेत आहेत.दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, मायक्रोसॉफ्ट ज्या फाल्कन सॉफ्टवेअरचा वापर करते त्यात एक नाव अपडेट आला आहे. हा अपडेट केल्यावर फाल्कन वापरल्या जाणाऱ्या सर्व ठिकाणी हा प्रॉब्लेम आला आहे. आणि यामध्ये सुधारणा होण्यासाठी ५ ते १० तास लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.तसेच, भारत सरकारच्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरला(NIC ) याचा कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. कारण NIC फाल्कनची सेवा घेत नाही.*मायक्रोसॉफ्टने दिलं स्पष्टीकरण*CrowdStrike ने या प्रकरणाची दखल घेत समस्येची चौकशी सुरू केली आहे. CrowdStrike च्या प्रतिनिधीने एक विधान जारी केले आहे की, विंडोज चालवणाऱ्या मशीनवर BSOD समस्या उद्भवणाऱ्या एका व्यापक समस्या निर्माण झाली.*झाल्याचा काय परिणाम झाला?** अमेरिकेत 200 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली.* भारतातील हवाई सेवेवरही परिणाम, ऑपरेशन्स मॅन्युअली केली जात आहेत.* स्काय न्यूजने प्रसारण बंद केले.* 74% वापरकर्ते मायक्रोसॉफ्ट स्टोअरमध्ये लॉग इन करू शकत नाहीत.* बँकिंग, टेलिकॉम, मीडिया आउटलेट्स आणि एअरलाइन्स सेवा जर्मनीमध्ये प्रभावित झाल्या आहेत.* लंडन स्टॉक एक्सचेंज ठप्प* दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठ्या बँक कॅपिटेकच्या सेवा प्रभावित* स्पेनमधील सर्व विमानतळांवर सेवा प्रभावित, दुबईमध्येही प्रभावित* 911 सेवा देखील अमेरिकेत पूर्णपणे बंद झाली* ब्रिटनमध्येही रेल्वे सेवा बंद