
मंडणगड तालुक्यात भरदिवसा बिबट्यांचा मुक्त संचार
मंडणगड तालुक्यातील देव्हारे या मुख्य गावापासून वडवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी भर दिवसा दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याने परिसरातून भीती व्यक्त होऊ लागली आहे. वनविभागाच्या दृष्टीने देव्हारे पंचक्रोशीचा परिसर हा घनदाट व बिबट्यांचे अधिवास सुरक्षित मानला गेला आहे. गतवर्षी वनविभागाने याच परिसरातून एका बिबट्यास पिंजऱ्यात पकडून त्याची वैद्यकीय तपासणी करुन त्यास सुरक्षित अधिवासात सोडले होते. अनेक वर्षांपासून त्याची वन्यजीवांचे मोजणी करण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे. त्याकडे वनविभागाने दुर्लक्ष केलेले आहे त्यामुळे तालुक्यातील बिबट्यांची संख्या कोणासही माहीत नाही. मात्र वाघाच्या प्रजातीत ठीपक्यांच्या वाघाचा तालुक्यातील वेळास ते देव्हारे परिसरात सर्वाधीक वावर दिसून आला आहे. मोठ्या प्रमाणावर खाजगी क्षेत्रातील जमीन मालकीत जंगलतोड झालेली आहे, ही बाब लक्षात घेता हा परिसर बिबट्याने मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळविण्याचे दिसत आहे