
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुुदुर्ग या दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांना राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने दिला दणका
कित्येक दिवस चर्चेत असलेल्या रत्नागिरी आणि सिंधुुदुर्ग या दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांना राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने (एनएमसी) दणका दिला आहे. या दोन्ही महाविद्यालयातील शिक्षकांची कमतरता व आवश्यक शैक्षणिक सुविधांच्या अभावामुळे २ महिन्यात सुधारणा करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. या दोन्ही महाविद्यालयांना पहिल्या टप्प्यात १२ लाखांचा दंड केला आहे.कोकणातील रत्नागिरी व सिंधुुदुर्ग ही दोन्ही वैद्यकीय महाविद्यालये पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनत आहेत. रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होवू घातल्या आहेत. मात्र गेल्या वर्षभरात या विद्यार्थ्यांना फक्त ५० टक्के शिक्षकांकडून शिक्षण घ्यावे लागत आहे. तर सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयातही तिसर्या वर्षानंतर शिक्षकांची कमतरता तसेच शैक्षणिक सुविधांचाा अभाव हाही गंभीर विषय ठरत असल्याचे मत शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.www.konkantoday.com