कशेडी बोगद्यात रस्ता दुभाजकासाठी रिकाम्या पिंपांची शक्कल
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील पोलादपूर हद्दीत खचलेल्या रस्त्यावरून नायट्रोजन वाहतुकीचा टँकर दरीत कोसळल्याच्या घटनेपासून कशेडी घाटाला पर्यायी बोगद्यातून दोन्ही दिशेने अवजड वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र ये-जा करणार्या वाहनांना मार्गिकेची शिस्त पाळण्यासाठी भुयारी मार्गात चक्क रिकामी पिंप उभी करत रस्ता दुभाजक म्हणून कामचलाऊ पद्धत अवलंबण्यात आली आहे. यामुळे भुयारी मार्ग पुन्हा चर्चेत आला आहे. या पिंपामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. www.konkantoday.com