
स्व. दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या विमानाचे चाचणी उड्डाण
संपूर्ण महामुंबई प्रदेश ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण बुधवारी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर अवतरला आणि स्व. दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या विमानाने चाचणी उड्डाण घेतले.दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे छोटे विमान बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता उतरले आणि एअरपोर्ट सिग्नल सिस्टीमची चाचणी घेत याच विमानाने पुन्हा झेप घेतली.विमान नवी मुंबई विमानतळ अजून बांधून पूर्ण झालेले नसताना तिथल्या धावपट्टीवर उतरलेल्या आणि पुन्हा उडालेल्या या छोट्या विमानाचे नवी मुंबईकरांना मोठे कौतुक होते. खास करून पनवेल शहरावरून अगदी 100 ते 150 फूट उंची वरून उडालेले हे विमान पाहण्यासाठी ठिकठिकाणी लोक माना वर करून उभे होते. विमानतळावरून झेप घेतल्यानंतर पनवेलच्या आजूबाजूच्या परिसरावर या विमानाने घिरट्या घातल्या. त्यात ही उड्डाणाची चाचणी असून लवकरच विमानतळ सुरू होणार याची खात्री पटल्याने नवी मुंबईकर खुश झाले आहेत. www.konkantoday.com




