रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील रुग्णांना कोल्हापूरमधील खाजगी हॉस्पिटलचे खिसे गरम करण्यासाठी तिकडे दाखल करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचा मनसेचा आरोप

रत्नागिरी जिल्ह्यातील गोरगरीब जनतेची आरोग्याची लाईफलाईन समजल्या जाणार्‍या जिल्हा शासकीय रूग्णालयात आवश्यक व अत्यावश्यक श्रेणीतील डॉक्टरांची संख्या गरजेपेक्षा अतिशय कमी आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयातील डॉक्टरांची तात्काळ भरती करा, अशी मागणी रत्नागिरी मनसेच्यावतीने वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडे केली आहे.जिल्हा शल्यचिकित्सकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ४० डॉक्टर्सची नितांत आवश्यकता असताना केवळ २० डॉक्टर्सच्या सहाय्याने या जिल्हा रूग्णालयाचा कारभार राम भरोसे चालू आहे. इतकेच नव्हे तर राजरोसपणे आजुबाजूच्या खाजगी रूग्णालयात रूग्णाला हलविण्याचे मार्गदर्शन केले जाते. अतिशय गंभीर अवस्थेतील रूग्ण तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता नसल्याने जीवाला देखील मुकत आहेत. ही अतिश निंदनीय आणि गंभीर बाब आहे.इतकेच नव्हे तर या अशा रूग्णांना रत्नागिरी, कोल्हापूरमधील खाजगी हॉस्पिटलचे खिसे गरम करण्यासाठी तिकडे दाखल करण्यास प्रवृत्त केले जाते. हे प्रकार तात्काळ थांबवावेत, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून या विरोधात संघर्ष करावा लागेल असे मनसेच्यावतीने प्रशासनाला सांगण्यात आले. वेळ पडल्यास मनसेच्या वतीने ठिय्या आंदोलनाचा इशारा यावेळेस देण्यात आला आहे. याचा पाठपुरावा मुख्यमंत्री कार्यालापर्यंत करून इथल्या कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेला रूळावर आणू असे आश्‍वासन डीन डॉ. रामानंद यांनी मनसे पदाधिकार्‍यांना दिले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button