
चिपळूण पवन तलाव व गोवळकोट क्रीडांगणाच्या विकासासाठी ३ कोटी ३५ लाखांचा निधीआ. शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश
चिपळूणमधील ऐतिहासिक पवन तलाव मैदान सुशोभीकरणासाठी राज्य शासनाकडून २ कोटी २५ लाख रुपयांचा निधी तर गोवळकोट येथील क्रीडांगण विकसित करण्यासाठी १ कोटी १० लाख रुपयांचा असा ३ कोटी ३५ लाखांचा निधी मंजूर करून आणण्यात आमदार शेखर निकम यांना यश आले आहे. राज्य शासनाकडून चिपळूण नगर परिषदेच्या या दोन क्रीडांगणांच्या विकासासाठी तीन कोटी ३५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याचे पत्र बुधवारी (दि. २८ जुलै) राज्याचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी दिले आहे राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान दिले जाते त्यातून तीन कोटी ३५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. कोरोना संकटात आमदार शेखर निकम यांनी नागरिकांना दिलासा दिला. त्यानंतर ते चिपळुणात आलेल्या महापुरातही अगदी पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत रात्रंदिवस ते मदतकार्यात गुंतले आहेत.
www.konkantoday.com