भंडारी समाजात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी रत्नागिरी भंडारी महाअधिवेशन घेणार -आशिष पेडणेकर
भंडारी समाजातील ग्रामीण टॅलेंटचा शोध घेवून त्यांना पुढे आणण्याचे काम रत्नागिरी तालुका भंडारी समाजाने करायला हवे. आजच्या तरूण पिढीला योग्य समुपदेशनाची गरज आहे. आयएएस, आयपीएस, एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी म्हणून एक वेगळा आर्थिक फंड उभारायला हवा. असे सांगतानाच लवकरच भंडारी समाजात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी रत्नागिरी भंडारी महाअधिवेशन घेणार असल्याचीही घोषणा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ट्रस्ट बोर्डचे चेअरमन तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यध आशिष पेडणेकर यांनी केली .www.konkantoday.com