खेड तालुक्यात डेंगू च्या साथीने डोके वर काढले

खेड तालुक्यात डेंग्यू साथीने डोके वर काढल्याने तालुका आरोग्य यंत्रणा पुरती खडबडून जागी झाली आहे. फुरूस भागात ८ डेंग्यूसदृश्य रूग्ण सक्रीय असल्याची माहिती उपलब्ध झाली. याशिवाय अन्य गावांमध्येही डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे समजते. त्या त्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सर्वेक्षण करण्यात येत असून आवश्यक त्या उपाययोजनांचा अवलंब सुरू असल्याचे सांगण्यात आले. शहरात डेंग्यूच्या साथीचा फैलाव होवू नये, यासाठी नगर प्रशासनामार्फत डोअर टू डोअर डास प्रतिबंधक फवारणीची मोहीम सुरूच आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button