
अशा डरकाळीला उदय सामंत घाबरत नाही:-पालकमंत्री उदय सामंत यांची आमदार राजन साळवी यांच्यावर टीका बॅनर लावून विकास होत नाही: मी विरोधकांना कामातून उत्तर देतो: पालकमंत्री उदय सामंत राजापूर मध्ये गरजले
राजापूर विधानसभा मतदार संघात नवीन फॅशन सुरु झाली असून आम्ही विकासकामे करायची, जनतेचे प्रश्न सोडवायचे आणि विरोधकांनी बॅनर लावून श्रेय्य घेण्याची सुरवात राजापूर मध्ये सुरु झाल्याचे एका कार्यक्रमा निमित्त सांगितले. राजापूरच्या मतदार संघाला ऐतिहासिक वारसा आहे ते जपण्याचे काम भविष्यात याच मतदार संघात होणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. ते पुढे म्हणाले, वाटुळ येथे होऊ घातलेल्या सुपर मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचा सिंधूरत्न समितीचे महाराष्ट्राचे सदस्य किरण सामंत यांनी पाठपुरावा केला मात्र डरकाळी फोडून श्रेय घेण्याचे काम येथील काही लोकप्रतिनिधी करत असून अशा डरकाळीला उदय सामंत घाबरत नाही आणि कोणाच्या टिकेला उत्तर देत नाही. मी जनतेची सेवा करून त्यांची कामे करून विरोधकांना उत्तर देतो असे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.