हे विठुराया आम्हा रत्नागिरी कराना माफ कर!
हे विठुराया आम्हा रत्नागिरी कराना माफ कर! आज आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही तुला मोठ्या भक्तिभावाने व मिरवणुकीने आणले पण बा विठ्ठला तुला देखील रत्नागिरीतील रस्त्यावरील खड्ड्याचा शेवटी त्रास झालाच आम्ही रत्नागिरीकर तसे खूपच सहनशील रस्त्यावरील खड्डे झाल्याने आम्ही कित्येक दिवस सोशल मीडिया वरून केवळ त्याबद्दल चर्चा करीत आहोत आगामी निवडणुका लक्षात घेऊन राजकीय पक्ष देखील तत्परतेने निवेदन देऊन यापुढे सहन करणार नाही असे सांगून वृत्तपत्रातून फोटोसह झळकवून घेत आहेत मात्र सामान्य रत्नागिरी कर आहे त्या परिस्थितीतून बाहेर आलेला नाही रस्त्यावरील खड्डे चुकवावे की रस्त्यावर पसरलेल्या बारीक खडीतून दुचाकी सावरत जावे या विंवचनेत रत्नागिरीकर असतानाच आज आषाढी एकादशी निमित्त तुझे मिरवणुकीने वाजत गाजत स्वागत केले आता विठुराया तूच तरी काहीतरी मार्ग काढ रे बाबा ! खड्डे बुजवण्याची जादू केली नाहीस तरी चालेल पण झापड लावून झोपलेल्या संबंधितांना सुबुद्धी दे की जेणेकरून ते रत्नागिरी करांची या समस्येपासून सुटका करतीलwww.konkantoday.com