
लाडक्या बहिणीप्रमाणेच आता आपण लाडक्या भावांना म्हणजेच विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
_राज्यातील भावांसाठीही आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगली बातमी आणली आहेमहायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहे. त्यामुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण आहे.दरम्यान, लाडक्या बहिणीसारखीच लाडक्या भावांसाठीही अशीच योजना सुरु करण्यात यावी, अशी मागणी तरुणवर्गाकडून केली जात होती. हीच बाब लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात शासकीय आज पहाटे शासकीय पूजा पार पडली. या पूजेनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी माध्यमांसोबत संवाद साधला. राज्यात चांगला पाऊस पडू दे, बळीराजा सुखी-समाधानी होऊ दे, असं साकडं आपण विठुरायाकडे घातल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.राज्यात आपण लाडकी बहीण योजना सुरू केली असून याचा लाभ लाखो महिलांना मिळत असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं. लाडक्या बहिणीप्रमाणेच आता आपण लाडक्या भावांना म्हणजेच विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणार आहोत. आता बारावी विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये, डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना ८ हजार रुपये आणि डिग्रीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपये स्टायफंड देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली.आपण राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली. पण पण लाडक्या भावाचं काय? त्यांच्यासाठीही आम्ही योजना सुरू केली आहे. त्यानुसार, आपला लाडका भाऊ म्हणजेच तरुण विद्यार्थी वर्षभर कंपनीत काम करेल, त्याला अप्रेंटीस म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे. त्या कंपनीत तो ट्र्रेन होईल. अप्रेंटीशीपचे पैसे सरकार भरणार आहे.इतिहासात पहिल्यांदाच अशी योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील महायुतीचे सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दरम्यान, राज्यातील मुलींसाठी १०० टक्के मोफत उच्च शिक्षणाची सोय आपण केली आहे. शेतकऱ्यांसाठीही विविध योजना सरकारच्या माध्यमातून होत आहेत, असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.