
मागील तीन दिवसांत कोकणात जवळपास साडेचार हजार एसटी बसेस दाखल.
गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांची वर्दळ सर्वत्र दिसत आहे. ग्रामीण भागात लालपरीबरोबरच ट्रेनमधून आलेले चाकरमानीही इतर वाहनांनी आपल्या नियोजित स्थळी पोहोचताना दिसत आहेत.मागील तीन दिवसांत कोकणात जवळपास साडेचार हजार एसटी बसेस दाखल झाल्या असून, त्यातून अडीच लाख चाकरमानी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पोहोचले आहेत. ट्रेन, खासगी बसेस, चारचाकीमधून येणार्या प्रवाशांमुळे जवळपास चार लाख चाकरमानी दाखल झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास दीड-दोन लाख चाकरमानी दाखल झाले आहेत.