
रत्नागिरी शहरातील पर्याची आळी येथील सदनिका फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 94 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला
मध्यंतरी थंडवलेले चोऱ्यांचे सत्र आता पुन्हा सुरू झाले आहेरत्नागिरी शहरातील पर्याची आळी येथील सदनिका फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 94 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला.याबाबत फिर्यादीने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, रविवार 14 जुलै रोजी ते कुटुंबासह त्यांच्या सासरी लांजा शिपोशी येथे गेलेल होते. या संधीचा फायदा उठवत अज्ञाताने पर्याची आळी येथील दिगंबरदास प्लाझामधील फिर्यादीच्या सदनिकेच्या दरवाजाची कडी व कुलुप उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी गोदरेज कपाटाच्या दरवाजाचा लॉकर उचकटून सोन्याचे 50 ग्रॅम वजनाचे 69 हजार रुपये किंमतीचे दागिने आणि रोख 25 हजार रुपये असा एकूण 94 हजार रुपयांचा मुद्देमाल लांवबला.