भरत गोगावले हे जरी तांत्रिकदृष्ट्या पालकमंत्री नसले तरी ते रायगडचे अदृश्य पालकमंत्री- उद्योग मंत्री उदय सामंत
लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार कधीही होऊ शकतो अशी चर्चा असताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या एका वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.भरत गोगावले हे जरी तांत्रिकदृष्ट्या पालकमंत्री नसले तरी ते रायगडचे अदृश्य पालकमंत्री आहेत असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं. भरत गोगावले हे भविष्यात दृश्य स्वरुपातील पालकमंत्री होतील असंही ते म्हणाले. रायगडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला पालकमंत्री आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी भरत गोगावले यांच्याबद्दलचे हे वक्तव्य केलं.विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याआधी महायुतीतील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे. या विस्तारात महाडचे आमदार भरत गोगावले यांचा नंबर जवळजवळ निश्चित असल्याची चर्चा आहे.