
चिपळूण शहरात पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या मगरीच्या पिल्लास जीवदान
चिपळूण शहरात रविवारी रात्री नदीच्या पात्रातील पाण्यात वाढ होऊन त्या पाण्याच्या प्रवाहातून नदीत असलेल्या मगरी लोक वस्तीत येण्याच्या घटना घडत असतात त्या तूनच एक मगरीचे पिल्लू चिपळूण येथील वाणीआळी येथील राम मंदिराच्या मागे श्री.श्रीधर मलोसरे यांच्या पाण्याच्या विहिरीत येऊन बसले व पुराच्या पाण्याचा निचरा झाल्या नंतर सदरचे मगिरीचे पिल्लू त्याच विहिरीत राहिले व त्याला वरती येता येत नव्हते .तर सदरचे मगर विहिरीत असल्याचे त्यांना सोमवार दिनांक१५/७/२४ रोजी सकाळी निदर्शनास श्री.मालुसरे यांच्या आले त्या नंतर त्यांनी वन विभागास संपर्क साधला असता.मा.सौ.गिरिजा देसाई , विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण), मा.श्री.वैभव बोराटे, सहाय्यक वन संरक्षक रत्नागिरी(चिपळूण), मा.श्रीम.राजश्री किर,वनक्षेत्रपाल चिपळूण यांच्या मार्गदर्शना खाली श्री.मालुसरे यांच्या विहिरीत मगर पकडण्यासाठी ट्रॅप पिंजरा सोडण्यात आला होता, सदर ट्रॅप पिंजऱ्यात दोन दिवसाच्या अथक प्रयत्ना नंतर बुधवार दिनांक १७/७/२४ रोजी विहिरीत असलेली मगर ट्रॅप पिंजऱ्यात जेरबंद झाली.सदर मगरीस सुरक्षित रित्या पिंजऱ्या सहित बाहेर कडून त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.सदरचे बचाव कार्य श्री. डी. आर.भोसले वनपाल चिपळूण ,श्री.राहुल गुंठे वनरक्षक कोळकेवाडी,श्री. आर. आर.शिंदे वनरक्षक रामपूर, श्री. नंदकुमार कदम वाहन चालक , श्री.संजय अंबवकर व श्री.सचिन भैरवकर यांनी केली