कशेडी बोगद्याच्या निकृष्ट कामाला ठेकेदार शिंदे डेव्हलपर्स आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता जबाबदार-माजी खासदार विनायक राऊत

कशेडी घाटातील बोगद्याचे काम अतिशय निकृष्ट झाले आहे. वेळीच पाहणी केली नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडून कशेडी बोगदा मृत्यूचा सापळा बनेल. कशेडी बोगद्याच्या निकृष्ट कामाला ठेकेदार शिंदे डेव्हलपर्स आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता जबाबदार आहेत.त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेते, माजी खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी रत्नागिरीत केली. कशेडी बोगद्याच्या निकृष्ट दर्जाची तक्रार पंतप्रधानांकडे केली असल्याचेही राऊत यांनी सांगितले.कशेडी बोगद्याचे काम देताना ते बोगद्याच्या कामाचा फारसा अनुभव नसलेल्या रिलायन्सला दिला. रिलायन्सने हे काम शिंदे डेव्हलपर्सला दिले. शिंदे डेव्हलपर्स ही केंद्रातील एका मंत्र्याची लाडकी कंपनी असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला. ते पुढे म्हणाले की, मी एक वर्षांपासून कशेडी बोगद्याच्या निकृष्ट कामाबाबत आवाज उठवत आहे. वारंवार मी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या. कशेडी बोगद्याचे काम इतके निकृष्ट आहे की पावसाळ्यात बोगद्यात पाण्याचे धबधबे सुरू आहेत. बोगद्याच्या निकृष्ट कामामुळे भविष्यात कशेडी बोगद्यामध्ये मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. ही दुर्घटना टाळण्यासाठी वेळीच कशेडी बोगद्याची पाहणी करणे गरजेचे आहे. कशेडी बोगद्याच्या निकृष्ट कामाची तक्रार मी जुलै महिन्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे, असे राऊत यांनी सांगितले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button