अशोक लेलँड कंपनीला महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळा (एमएसआरटीसी) कडून व्हायकिंग प्रवासी बसेसचे कंत्राट

* हिंदुजा समुहाची वाहन उत्पादक कंपनी अशोक लेलँड कंपनीला महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळा (एमएसआरटीसी) कडून व्हायकिंग प्रवासी बसच्या २,१०४ युनिट्ससाठी एकच सर्वात मोठी पूर्णतः तयार झालेल्या बसेसचे कंत्राट मिळाले आहे.महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) हे १५,००० हून अधिक बसेस असलेले देशातील सर्वात मोठ्या राज्य परिवहन महामंडळांपैकी एक आहे. या ऑर्डरमुळे अशोक लेलँडच्या बसेसचे ताफ्यात वर्चस्व राहणार आहे. या आधुनिक, पूर्णतः तयार बसेस नवीन सीएमवीआर मानकांशी पूर्णपणे सुसंगत असतील. त्यामध्ये एआयएस १५३ अनुरूप बॉडी आणि १९७ एचपी एच-सीरिज इंजिनसह सिद्धहस्त आयजेन ६ बीएस, ६ ओबीडी, २ तंत्रज्ञान, तसेच रीअर एअर सस्पेंशन हे इतर महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांमध्ये असणार आहे. या बसेस अशोक लेलँडच्या विशेष बसेस बॉडी प्लांटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उत्पादित केल्या जातील आणि सुधारित वाढीव सुरक्षितता, अधिक आराम आणि एमएसआरटीसीसाठी कमी किमतीला एकूण मालकी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button