अर्जुना नदीवरील पुलाला भाई हातणकर यांचे नाव देण्याचा ठराव
अर्जुना नदीवर बांधण्यात आलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वाधिक उंचीच्या पुलाला राजापूरचे पहिले राज्यमंत्री (कै.) ल. र. तथा भाई हातणकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखेच्यावतीने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्याप्रमाणे महामार्गावरील अर्जुना नदीवरील पुलाला भाई हातणकर यांचे नाव देण्याचा ठराव जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये झाला असून, त्याची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. अशी माहिती कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा राजापूरचे अध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य दीपक नागले यांनी दिली.