लोटे एमआयडीसी फिरतायत कागदपत्राविना अनेक अवजड वाहने, तपासणीची मागणी
लोटे औद्योगिक वसाहतीत जोखमीची कामे करणाऱ्या अवजड वाहनचालक वा मालकांकडे गाड्यांची कोणतीच कागदपत्रे नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहेअवजड वाहनांचा अपघात झाल्यास अडचणी निर्माण होता. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील अवजड वाहनांची तपासणी करण्याची मागणी होत आहे.खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत विविध प्रकारच्या कंपन्या कार्यरत आहेत. या औद्योगिक वसाहतीत जसे उत्पादन केलेल्या मालाची वाहतूक करणे वा कच्चा माल घेऊन येणारे वाहन हे वाहतूक विभागाच्या निकषावर बंधनकारक असण्याची आवश्यकता असते. तसेच इथे वसाहतीच्या विविध विभागात काम करणाऱ्या वाहनांनाही हा नियम लागूहोतो. मात्र, या परिसरातील विविध विभागात काम करणारे डंपर, ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलन मशीन, फराना, हायड्रा, क्रेन, टँकर या वाहनांची कागदपत्रे नसल्याचे सांगण्यात येत आहे.