
खाजगी कोरोना रुग्णालयाच्या वाढीव बिलाबाबत पाहणी करण्याचे नामदार उदय सामंत यांचे जिल्हा शल्यचिकित्सक यांना आदेश
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खाजगी कोवीड केअर सेंटर सुरू झाली आहेत त्यातून अव्वाच्या सव्वा बिले केली जात असून त्यांची याबाबत तक्रारी आल्या असल्याने खाजगी कोरोना रुग्णालयाच्या आर्थिक बाबी व आरोग्य सेवेची पाहणी करावी असे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संघमित्रा फुले यांना नामदार उदय सामंत यांनी दिले आहेत
www.konkantoday.com