मुंबई एक्स्प्रेस हायवेजवळ पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या बसची ट्रॅक्टरला धडक बसून खड्ड्यात पडल्याने पाच जणांचा मृत्यू
मुंबई एक्स्प्रेस हायवेजवळ बसची ट्रॅक्टरला धडक बसून खड्ड्यात पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेआत भाविक असलेली बस डोंबिवलीच्या केळझर गावातून पंढरपूरला जात होती.आषाढी एकादशीनिमित्त हे लोक खासगी बसमधून पंढरपूरला जात होते. बस ट्रॅक्टरला धडकून खड्ड्यात पडली. यामध्ये 42 जण जखमी झाले, त्यांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर 3 जणांना सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे, डॉक्टरांनी 5 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.”या अपघातामुळे मुंबई एक्स्प्रेस हायवेवरील मुंबई-लोणावळा लेनवरील वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती. क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढता आली आणि तीन तासांनंतर लेनवरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.