
माझी जमीन दिली हे सिध्द करावे, अन्यथा आत्मक्लेश करून घ्यावा- मंत्री दीपक केसरकर यांचे माजी खासदार विनायक राऊत यांना आव्हान
आजगाव येथे असलेली आमची जमीन ही वडिलोपार्जित आहे. त्या ठिकाणी होत असलेल्या प्रकल्पात आमची एक इंच सुध्दा जमीन जात नाही. त्यामुळे विनायक राऊत यांनी माझी नाहक बदनामी करू नये.मी त्या ठिकाणी प्रकल्प आणला माझी जमीन दिली हे सिध्द करावे, अन्यथा आत्मक्लेश करून घ्यावा, असे प्रतिआव्हान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेयावेळी त्यांनी स्थानिकांना प्रकल्प नको असेल तर तो केला जाणार नाही. मी ग्रामस्थांसोबत आहे, अशी भूमिकाही घेतली.उद्धवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी दोन दिवसापूर्वीच केसरकर कुटुंबियांची आजगाव येथील मायनिंग क्षेत्रात जमिन असल्याचा आरोप केला होता. त्याला केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, आजगाव येथे होणार्या मायनिंग प्रकल्पाबाबत आपल्याला माहित नाही. तेथील स्थानिक लोकांना प्रकल्प नको असतील तर तेथे प्रकल्प होणार नाही. लवकरच याबाबत मी त्यांची भेट घेणार आहे. मात्र त्या ठिकाणी असलेली आमची जागा ही वडिलोपार्जित आहे. विषेश म्हणजे त्या ठिकाणी असलेली एक एकर जमीन सुध्दा मायनिंग मध्ये जात नाही अशा परिस्थिती मीच प्रकल्प आणला, असा राऊत यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. असेही केसरकर यांनी सांगितले