
रायगड जिल्ह्यातील महाड-विन्हेरे मार्गावर अपघातात सहाजण जखमी
रायगड जिल्ह्यातील महाड-विन्हेरे मार्गावर गुरूवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर अचानक आडव्या आलेल्या गुरांमुळे चालकाने ब्रेक लावल्याने इर्टिगा कार उलटून झालेल्या अपघातात सहाजण जखमी झाले.सागर वसंत गुंजाळ (३०, रा. अंधेरी), रोशन कृष्णमोहन त्रिपाठी (२८, वसई), सोनू राजाराम पटेल (३०, वसई) राजेश मुकुंद निर्भवते (५०, रा. गोरेगाव), पंजक प्रकाश पवार (५०, रा. गोरेगाव), देवदत्त वासुदेव घाटी (३०, विरार) अशी जखमींची नावे आहेत. ते आपल्या ताब्यातील इर्टिगा कारमधून (एमएच ४७/एजी-६६१०) प्रवास करत असताना महाडजवळील शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गोमंतक हॉटेलनजिक रस्त्यावर गुरे आडवी आली. या गुरांना वाचविण्यासाच्या प्रयत्नात चालकाने अचानक ब्रेक मारल्याने कार उलटली. जखमींना उपचारासाठी महाड ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. www.konkantoday.com