दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञानाकरिता अर्थसहाय्य देणे या योजनेचा लाभ घ्यावा रत्नागिरी, दि. 16 (जिमाका) : दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञानाकरिता अर्थसहाय्य देणे या योजनेचा लाभ दिव्यांग लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

अंधव्यक्तींसाठी, कर्णबधीर व्यक्तींसाठी, अस्थिव्यंग व्यक्तींसाठी व मतिमंद व्यक्तींसाठी सहाय्यभूत उपकरणे व साधने तसेच तज्ञाने शिफारस केलेली अन्य सहाय्यभूत साधने, दिव्यांग व्यक्तीना स्वयंरोजगबासाठी अर्थसहाय्य देणे, दिव्यांग व्यक्तींसाठी घरकुल योजना, दिव्यांग- दिव्यांग व्यक्तींना विवाहसाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. तसेच दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांग खेळाडू यांना अर्थसहाय्य देणे यासारखे लाभ देण्यात येतात. तरी या योजनांचा दिव्यांग लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button