झोमॅटो आणि स्वीगी या दोन्ही फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सने आपले डिलिव्हरी चार्चेस तब्बल 20 टक्क्यांनी वाढवले

आजकाल ऑलाईन पद्धतीने जेवण मागवण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. जेवण बनवण्याचा कंटाळा आला की लगेच हातातील मोबाईलच्या मदतीने जेवणाची ऑर्डर दिली जाते. झोमॅटो आणि स्विगी या ऑनलाईन जेवणाच्या ऑर्डर पुरवणाऱ्या दिग्गज कंपन्या आहेत.या क्षेत्रात या दोन कंपन्यांची मक्तेदारी आहे. दरम्यान, एका झटक्यात ऑनलाईन फूड ऑर्डर करणं चांगलंच महागणार आहे. कारण झोमॅटो आणि स्वीगी या दोन्ही फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सने आपले डिलिव्हरी चार्चेस तब्बल 20 टक्क्यांनी वाढवले आहेत. या निर्णयामुळे आता ऑनलाईन फूड मागवणाऱ्यांच्या खिशाला झळ बसणार आहेस्वीगी आणि झोमॅटो या दोन्ही प्लॅटफॉर्मवरून खाद्यपदार्थ ऑर्डर करणे आता महागणार आहे. कारण या दोन्ही कंपन्यांनी प्रत्येक ऑर्डरसाठीचे चार्जेस 20 टक्क्यांनी वाढवले आहेत. आता या दोन्ही कंपन्या प्रत्येक ऑर्डसाठी सहा रुपये घेणार आहेत. याआधी प्रत्येक ऑर्डरसाठी या दोन्ही कंपन्या पाच रुपये घ्यायच्या. वाढीव चार्जेस बंगळुरू, दिल्ली या ठिकाणी सध्या हा निर्णय लागू केला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button