खेड तालुक्यातील शेल्डी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
खेड तालुक्यातील शेल्डी धरणावर चार मित्रांसमवेत फिरण्यासाठी गेलेला तरुण पाण्यात बुडायला होता. त्याचा शोध लागत नव्हता. अखेर २० तासांनी त्याचा मृतदेह सोडून आला. जयेश आंब्रे (32, रा. शेल्डी-खालचीवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा रविवारी सायंकाळच्या सुमारास पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला होता. शोधकार्यानंतर तब्बल 20 तासांनी सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह धरणालगत आढळून आला. त्याच्या मृत्यूने आंब्रे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दोन वर्षापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. मुंबईहून एक तरुण आपल्या मित्रांसोबत खेड तालुक्यातील शेल्डी येथे त्याच्या गावी गेला होता. गावी गेल्यानंतर तो मित्रांसोहत शेल्डी येथील धरणावर गेला गावी गेल्यानंतर तो मित्रांसोबत शेल्डी येथील धरणावर गेला होता. मात्र धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण धरणात वाहून गेला.