
अंत्रवलीतील पाणलोट कार्यक्रमात भ्रष्टाचाराच्या चौकशी अहवाल दडपला; या प्रकरणाची पुन्हा उच्चस्तरीय चौकशी करण्याची पत्रकार संदेश जिमन यांची मागणी
मौजे अंत्रवली ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथील पाणलोट कार्यक्रमात झालेला भ्रष्टाचार गैरव्यवहार याविषयी काही महिन्यापूर्वी जिल्हा कृषी अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करण्यात आली असून पुरावे दाखवून सुद्धा (सापडून सुद्धा) चौकशी अहवाल व अभिप्राय या या मध्ये सर्व प्रकार दडपण्यात आला असल्याचा आरोप होत आहेसदर प्रकरणाची पुन्हा उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत भ्रष्टाचार मुक्त ‘सुजलाम सुफलाम’ असावा या हेतूने पत्रकार संदेश जिमन यांनी पत्राद्वारे हा विषय सविस्तर आणि तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांना सादर केला असून ही चौकशी पारदर्शी पणे झाली नाही तर १५ ऑगस्ट २०२४ रोजी बेमुदत उपोषणाला बसणार आहे असे कळविण्यात असे आले असून सदर पत्राची प्रत राज्याचे कृषी मंत्री, जिल्हा कृषी अधीक्षक,तहसीलदार, यांना सादर केली असून भारताच्या प्रधानमंत्री यांना ही ट्विट केली आहे.