सव्वाशे कोटींचे वाटप करून माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला साडेचार लाख मते मिळाली-माजी खासदार विनायक राऊत
सिंधुदुर्गातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार निवडून यावेत, यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी. तसेच उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत हाच पारकर यांच्या वाढदिनाचा संकल्प सर्वांनी करूया, असे आवाहन माजी खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केले.माजी खासदार श्री.राऊत म्हणाले, ”लोकसभा निवडणुकीत सव्वाशे कोटींचे वाटप करून माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला साडेचार लाख मते मिळाली. तर मी एक रूपया देखील खर्च न करता मला चार लाख मतदारांनी पसंती दिली. मतदारांच्या प्रामाणिकपणाला आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना कदापि विसरणार नाही.” यावेळी शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी प्रमुख नीलम सावंत पालव यांनी श्री.पारकर यांना शुभेच्छा दिल्या.